Green Manure Crop : शेतासाठी धैंचा आहे संजीवनी ; मातीचे आरोग्य सुधारेल

Mahesh Gaikwad

सेंद्रीय शेती

देशभरात सेंद्रीय शेतीसह नैसर्गिक शेतीला प्रोत्सहन दिले जात आहे. अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळताना दिसत आहेत.

Green Manure Crop | Agrowon

हिरवळीचे खत

धैंचा हे एक हिरवळीचे खत आहे. जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी धैंचा फायदेशीर पर्याय आहे.

Green Manure Crop | Agrowon

धैंचा

आज आपण सेंद्रीय शेतीमध्ये उपयुक्त असणाऱ्या धैंचा या हिरवळीच्या खताचे फायदे सांगणार आहोत.

Green Manure Crop | Agrowon

नत्राचे प्रमाण

धैंचा हे एक कडधान्य पीक असून याचा वापर जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून केला जातो.

Green Manure Crop | Agrowon

धैंचा लागवड

धैंचाची लागवड करून १० टक्के रासायनिक खताचा वापर कमी प्रमाणात करू शकतो. धैंचाची उंची साधारणपणे ४ ते ५ फुटापर्यंत वाढते.

Green Manure Crop | Agrowon

सेंद्रीय कर्ब

जमिनीतील बायोमास वाढविण्यासाठी धैंचाचा वापर केला जातो. यामुळे जमिनीचा सेंद्रीय कर्ब आणि उत्पादन क्षमता वाढते.

Green Manure Crop | Agrowon

गाडण्याची प्रक्रिया

४० ते ४५ दिवसांनंतर धैंचाची जमिनीत गाडण्याची प्रक्रिया केली जाते. क्षाराचे प्रमाण जास्त असेलेल्या जमिनीत याची वाढ चांगली होते.

Green Manure Crop | Agrowon

जमिनीत मिसळते

उभी-आडवी नांगरणी करून धैंचा जमिनीत गाडल्यास थोड्याच दिवसांत ते जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळते.

Green Manure Crop | Agrowon

धैंचा उत्पादन

एका एकरामध्ये २०-२५ किलो बियाण्यांपासून ८-९ टन हिरवळीचे खत मिळते. पिकाची उंची जास्त असल्यास १० टनांपर्यंत खत मिळते.

Green Manure Crop | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....