Somawati Amavasya : देवा तुझी सोन्याची जेजुरी ; सोमवतीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर

Mahesh Gaikwad

महाराष्ट्राचं कुलदैवत

अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाचा सोमवती अमावस्येचा सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला.

Somawati Amavasya | Agrowon

जेजुरी खंडोबा

सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. यात्रेसाठी राज्यातून लाखोंच्या संख्यने भाविक येतात.

Somawati Amavsya | Agrowon

सोमवती अमावस्या

सोमवतीनिमित्त जेजुरी गडावर सोमवतीची यात्रा भरते. भाविकांकडून गडावर भंडाऱ्याच्या मुक्तपणे उधळण केली जाते.

Somawati Amavasya | Agrowon

सोमवती यात्रा

सोमवारी ८ एप्रिलला सोमवतीचा पालखी सोहळा पार पडला. 'यळकोट यळकोट जय मल्हार'चा जयघोष करत भाविकांनी गडावर भंडाऱ्याची उधळण केली.

Somawati Amavasya | Agrowon

भाविकांची गर्दी

सोमवतीनिमित्त जेजुरीमध्ये सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती. देवाच्या पालखी सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.

Somawati Amavasya | Agrowon

खंडोबा पालखी

पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरू असताना पोत्याने भंडाऱ्याची उधळण केली जात होती. भर उन्हातही खांदेकरी व मानकरी आणि भाविकांच्या गर्दीने गड फुलून गेला होता.

Somawati Amavasya | Agrowon

पालखी स्नान

सायंकाळी पालखीला कऱ्हा नदीवर स्नान घालण्यात आले. कऱ्हा नदीच्या पाण्याने व दही-दुधाने खंडोबाच्या उत्सवमूर्तींना यावेळी स्नान घालण्यात आले.

Somawati Amavasya | Agrowon