Deoni Cow : शेतीकामच नाही तर दूध उत्पादनालाही दमदार देवणी गोवंश

Mahesh Gaikwad

देवणी गोवंश

डांगी, गीर आणि स्थानिक देशी गोवंशाच्या संकरातून मराठवाड्यात देवणी गोवंश तयार झाला आहे.

Deoni Cow | Agrowon

शेतीकामातही उपयुक्त

देवणी गोवंशाची खासियत म्हणजे शेतीकामासोबतच दूध उत्पादनातही हा गोवंश उपयुक्त आहे.

Deoni Cow | Agrowon

दुष्काळी परिस्थिती

तसेच दुष्काळी परिस्थितीत कोरडा निकृष्ट चारा खाऊन ऊन वारा, पाऊस आणि थंडी सहन करणारा देवणी हा गोवंश आहे.

Deoni Cow | Agrowon

देवणीचा अधिवास

देवणी गोवंशाचा अधिवास प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून नांदेड जिल्ह्यातील देगलूरपर्यंत आहे. या भागातील बालाघाट पठारावरील मांदरा नदीच्या खोऱ्यात हा गोवंश आढळतो.

Deoni Cow | Agrowon

देवणीचे उगमस्थान

देवणी गोवंशाचे मूळ उगमस्थान जिल्ह्यातील देवणी तालुका आहे. या जातीची जनावरे संपूर्ण लातूर जिल्हा, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यात आढळतो.

Deoni Cow | Agrowon

देवणी गोवंशांची वैशिष्ट्ये

देवणी गोवंशाचा बांधा मध्यम आकाराचा आणि आटोपशीर असतो. त्याचा मूळ रंग पांढरा आणि त्यावर काळ्या रंगाचे अनियमित ठिपके असतात.

Deoni Cow | Agrowon

दूध उत्पादन

देवणी गोवंशाची गाय पहिल्या वेतात सरासरी ६०० ते ८०० लिटरपर्यंत दूध देते. देवणी गायीच्या दूध, दही, ताक आणि तुपासह इतर पदार्थांना मोठी मागणी आहे.

Deoni Cow | Agrowon
Animal Care | Agrowon