Anuradha Vipat
निरोगी दातांसाठी खालील ५-६ महत्त्वाचे उपाय नक्की करा. दांत आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केवळ ब्रश करणे पुरेसे नसते
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फ्लोराईडयुक्त टूथपेस्टने ब्रश करणे अत्यंत आवश्यक आहे.
जिभेवर साचलेले पांढरे थर बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.
ब्रश पोहोचू शकत नाही अशा दातांच्या फटींमधील घाण काढण्यासाठी दिवसातून एकदा फ्लॉस वापरा.
गोड पदार्थ, चॉकलेट्स आणि थंड पेये दातांचे इनॅमल खराब करतात.
पाणी प्यायल्याने तोंडात लाळ तयार होते, जी नैसर्गिकरित्या दात स्वच्छ ठेवण्याचे आणि आम्ल कमी करण्याचे काम करते.
दूध, दही, पनीर आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.