Anuradha Vipat
दुधी भोपळ्याची भाजी ही शरीरासाठी अत्यंत थंडगार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पाहूयात हॉटेल स्टाईल किंवा लग्नाच्या पंगतीसारखी चवदार दुधी भोपळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी .
दुधी भोपळा, चना डाळ ,कांदा,टोमॅटो,आले-लसूण पेस्ट,कोथिंबीर,तेल, मोहरी, जिरे, हिंग, ७-८ कढीपत्त्याची पाने, लाल तिखट, हळद, धने पूड, गरम मसाला, मीठ चवीनुसार.
गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी द्या.फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून १ मिनिट परतून घ्या. आता टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत छान तेल सुटेस्तवर शिजवून घ्या.
गॅस बारीक करा आणि त्यात हळद, लाल तिखट, धने पूड आणि गरम मसाला घाला. सर्व मसाले कांदा-टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करा.
आता या मसाल्यामध्ये भिजवलेली चणा डाळ आणि दुधी भोपळ्याचे तुकडे टाका. २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर भाजी मसाल्यांसोबत छान परतून घ्या.
चवीनुसार मीठ घाला आणि भाजी शिजण्यासाठी फक्त १/२ कप पाणी घाला .मध्यम आचेवर २ ते ३ शिट्ट्या काढून घ्या . भरपूर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर भुरभुरा. तुमची गरमागरम आणि खमंग दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे!