Okra Cultivation : जळगाव जिल्ह्यात भेंडी लागवडीत घट

Radhika Mhetre

बाजारातील आवक कमी दिसत आहे. दरात वाढ झाली, परंतु या दरांचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.

Okra Cultivation | Agrowon

एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागात भेंडी पीक असते.

Okra Cultivation | Agrowon

धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते. पावसाळ्यातही या भागात भेंडी असते. परंतु सध्या भेंडीची लागवड कमी झाली आहे.

Okra Cultivation | Agrowon

ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून पुढील महिन्यात किंवा ३० ते २३ दिवसानंतर भेंडीची काढणी सुरू होईल. यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक कमी झाली आहे.

Okra Cultivation | Agrowon

या भागातील ज्या शेतकऱ्यांची भेंडी काढणीवर आहे, त्यांना थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत ३८ ते ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

Okra Cultivation | Agrowon

कमी दर्जाच्या किंवा दुय्यम दर्जाच्या भेंडीसही २५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. या गावांत एरंडोल, धरणगाव भागातील मोठे खरेदीदार, एजंट भेंडीची खरेदी करीत आहेत.

Okra Cultivation | Agrowon

या भेंडीची पाठवणूक मुंबई, ठाणे, मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील सुरत, बडोदा येथे केली जात आहे.

Okra Cultivation | Agrowon