Anuradha Vipat
मधमाशीच्या डंखामुळे सहसा सौम्य जळजळ, सूज किंवा खाज येते. जर चावा घशात किंवा तोंडात घेतला असेल तर ते अधिक धोकादायक ठरू शकतं.
मेलबर्न विद्यापिठाच्या अहवालानुसार, मधमाशीचं विष हे प्रथिने आणि रसायनांचं एक शक्तिशाली मिश्रण आहे.
जर चावा श्वासनलिकेला घेतला असेल तर सूज येऊन श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो
मधमाशी चावल्यास त्वरित उपाय करणं आवश्यक आहे. विषाचा परिणाम कमी करण्यासाठी 30 सेकंदांच्या आत डंख काढून टाकावा.
जर डंख घशात असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येणं किंवा तीव्र सूज येणं अशी लक्षणे दिसली तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी
मधमाशीचं विष जर तोंडात किंवा घशात चावल्यामुळे रक्तप्रवाहात गेलं तर त्यामुळे श्वसनमार्गात सूज येऊ शकते
जर मधमाशीने जिभेला चावलं असेल तर तिचं विष लगेच रक्तात जाऊ शकतं. यामुळे लगेचच आपलं शरीर ॲलर्जिक प्रतिक्रिया देऊ शकते.