Anuradha Vipat
दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक सोपे उपाय सांगितले गेले आहेत
'श्री गुरुचरित्र' या पवित्र ग्रंथाचे वाचन हा त्यांची कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो.
दत्तगुरूंचा वार गुरुवार मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून दत्तगुरूंच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी
रोज सकाळी आणि संध्याकाळी आंघोळीनंतर शांत बसून 'श्री गुरुदेव दत्त' या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.
दर गुरुवारी जवळच्या दत्त मंदिरात दर्शनासाठी जावे. औदुंबराच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालणे खूप शुभ मानले जाते.
गरीब, भुकेले आणि गरजू लोकांना अन्नदान करणे, वस्त्रदान करणे किंवा सेवा करणे हा त्यांची कृपा मिळवण्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे.
अमावस्येला किंवा पितरांच्या तिथीला त्यांचे स्मरण करून त्यांना तर्पण द्यावे.