PM Kisan : 'पीएम किसान'च्या १७ व्या हप्त्याची तारीख मुकर्रर

Mahesh Gaikwad

शेतकऱ्यांना दिलासा

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्विकारताच देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे.

PM Kisan | Agrowon

तिसऱ्यांदा पंतप्रधान

१० जून रोजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून किसान सन्मान योजनेच्या निधी हस्तांतरणाच्या फाईलवर पहिली सही केली.

PM Kisan | Agrowon

आचार संहिता

लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे योजनेचा १७ वा हप्ता रखडला होता. पण आता योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार याची तारीखही समोर आली आहे.

PM Kisan | Agrowon

पीएम किसान योजना

पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत १६ हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

PM Kisan | Agrowon

१७ वा हप्ता

येत्या १८ जून २०२४ रोजी योजनेच्या १७ व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

PM Kisan | Agrowon

डीबीटी

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून १७ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

PM Kisan | Agrowon

बँक खात्यात रक्कम

१७ व्या हप्त्यापोटी देशातील ९.३ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये जमा होणार आहे.

PM Kisan | Agrowon

२० हजार कोटी

योजनेच्या १७ व्या हप्त्यामध्ये एकूण २० हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

PM Kisan | Agrowon