Anuradha Vipat
मराठमोळा लूक ही आपल्या देशाची शान आहे. सण-समारंभ आणि कोणत्याही पारंपरिक कार्यक्रम असो मराठमोळ्या लूक शिवाय तो अपूर्णचं.
आता दसरा नुकताचं येणार आहे. या दसऱ्याला तुम्हीही असा मराठमोळा लूक करु शकता. चला पाहूयात मराठमोळा लूकच्या काही टिप्स.
मराठमोळा लूक महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवणारी पारंपरिक वेशभूषा आहे.
नऊवारी साडी ही आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा आहे
सध्या पारंपरिक दागिने जसे की पाटल्या, नथ आणि हातात शिंदेशाही तोडे घालण्याचा ट्रेंड आहे.
नऊवारी साडीवर खांद्यावरून घेतलेला शेला लूकला अधिक पारंपरिक बनवतो.
केसांचा खोपा आणि त्यात केसांना माळलेला गजरा मराठमोळ्या लूकला अजूनचं क्लासी बनवतो.