Food Adulteration : ताटातील विष! भेसळयुक्त अन्नामुळे वाढतोय आजारांचा धोका; अशी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

Anuradha Vipat

विषारी घटक

भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनामुळे शरीरात जड धातू, रसायने आणि कृत्रिम रंग यांसारखे विषारी घटक साचतात.

Food Adulteration

रोगप्रतिकारशक्ती

दैनंदिन वापरातील दूध, मसाले, तेल, फळे आणि मिठाईमध्ये होणारी भेसळ आपल्या पचनसंस्थेवर आणि रोगप्रतिकारशक्तीवर थेट आघात करते.

Food Adulteration | Agrowon

अन्नविषबाधा आणि पचनाचे विकार

कृत्रिम रंग, अखाद्य तेल आणि रसायनांच्या सेवनामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि गॅस्ट्रोसारखे पोटाचे गंभीर विकार उद्भवतात.

Food Adulteration | Agrowon

यकृत आणि किडनी

अन्नपदार्थांमधील विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकताना यकृत आणि मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण येतो.

Food Adulteration | Agrowon

कर्करोगाचा धोका

मसाले आणि मिठाईला आकर्षक रंग येण्यासाठी वापरले जाणारे कृत्रिम रंग तसेच फळे पिकवण्यासाठी वापरले जाणारे 'कॅल्शियम कार्बाइड' शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

Food Adulteration | Agrowon

हृदयविकार

खाद्यतेलात स्वस्त अखाद्य तेलाची भेसळ केल्यास 'ड्रॉप्सी' सारखे गंभीर आजार आणि हृदयविकार होऊ शकतात. तसेच शिसे यांसारख्या जड धातूंमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतो.

Food Adulteration | Agrowon

मुलांची वाढ खुंटणे

दुधामध्ये पाणी, डिटर्जंट किंवा युरियाची भेसळ केल्यास त्यातील पोषक मूल्ये नष्ट होतात. याचा लहान मुलांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीवर गंभीर परिणाम होतो.

Food Adulteration | agrowon

Waterborne Diseases : दूषित पाण्यामुळे वाढतो 'या'आजारांचा धोका

Waterborne Diseases | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...