Sleeping Pills Side Effects : झोपेच्या गोळ्या घेताय? सावधान! शरीरावर आणि मेंदूवर होतात हे अत्यंत गंभीर दुष्परिणाम

Anuradha Vipat

शांत झोप

आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि मानसिक ताणामुळे अनेकांना रात्री शांत झोप येत नाही.

Sleeping Pills Side Effects | Agrowon

झोपेच्या गोळ्या

अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा सतत झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय अनेकांना लागते.

Sleeping Pills Side Effects | Agrowon

शरीरासाठी अत्यंत घातक

या गोळ्या तात्पुरती झोप आणत असल्या, तरी दीर्घकाळ विचार केला तर त्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

Sleeping Pills Side Effects | Agrowon

गोळ्यांचे व्यसन

सतत झोपेच्या गोळ्या घेतल्याने मेंदूला त्याची सवय होते. काही दिवसांनी या गोळ्या घेतल्याशिवाय नैसर्गिकरीत्या झोप येणे पूर्णपणे बंद होते.

Sleeping Pills Side Effects | agrowon

स्मरणशक्ती

झोपेच्या गोळ्यांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे गोष्टी लक्षात न राहणे, लक्ष केंद्रित करता न येणे आणि गोंधळल्यासारखे वाटणे अशा समस्या उद्भवतात.

Sleeping Pills Side Effects | Agrowon

सकाळी सुस्ती आणि थकवा

रात्री गोळी घेऊन झोपल्यानंतरही सकाळी उठल्यावर उत्साह वाटण्याऐवजी दिवसभर डोके जड होणे, चक्कर येणे आणि प्रचंड आळस जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात.

Sleeping Pills Side Effects | Agrowon

श्वसनाचा त्रास

काही झोपेच्या गोळ्या शरीरातील श्वसन प्रक्रिया मंदावतात. ज्या लोकांना आधीच दम्याचा किंवा घोरण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी या गोळ्या अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

Sleeping Pills Side Effects | Agrowon

Weekend Sleep : वीकेंडला उशिरापर्यंत झोपण्याची सवय आहे? शरीरावर होणारे हे फायदे आणि गंभीर तोटे नक्की जाणून घ्या

Weekend Sleep | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....