Anuradha Vipat
तुमच्या वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे हे ठरवण्यासाठी एक साधे गणिती सूत्र वापरले जाते.
तुमच्या शरीराच्या वजनाला ३० ने भागा. जे उत्तर येईल तितके लिटर पाणी तुम्ही दिवसाला प्यायले पाहिजे
जर तुमचे वजन ६० किलो असेल तर ६० ÷ ३० = २ लिटर पाणी दिवसाला प्या.
जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल, तर व्यायामाच्या दर अर्ध्या तासासाठी ३०० ते ५०० मिली पाणी प्यावे.
उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात घामावाटे पाणी बाहेर पडत असल्याने प्रमाण थोडे वाढवावे.
ताप किंवा जुलाब होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाण्याचे प्रमाण वाढवावे.
एकाच वेळी खूप जास्त पाणी पिण्याऐवजी दिवसभरात थोडे थोडे पाणी प्या