Anuradha Vipat
कार्यक्षेत्रात उत्तम सुसंवाद साधाल. बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होतील. प्रवासाचे बेत तूर्तास पुढे ढकलावे.
महत्त्वाची कामे रखडल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. पैशांचे नियोजन योग्य राहील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील आणि जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. जुन्या कौटुंबिक समस्या दूर होतील.
कामाच्या ठिकाणी कर्मचारीवर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. मित्र किंवा नातेवाईकांसोबतचे जुने गैरसमज दूर होतील.
विद्यार्थ्यांना अभ्यासात सुयश लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील आणि धनलाभाचे योग आहेत.
तुमच्या कार्यपद्धतीमुळे समाजात प्रभाव व चांगली ओळख निर्माण होईल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. एखादी नवीन व महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडू शकते.
व्यवसायात नवीन तंत्र आणि कल्पना अमलात आणल्याने आर्थिक लाभ होतील. चारचौघात मान-सन्मान वाढेल.
मन आनंदी आणि आशावादी राहील; करिअरमध्ये नवी दिशा मिळेल. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदीचे बेत फायदेशीर ठरतील.
सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये तुमचा पुढाकार राहील. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे चांगले संकेत मिळतील.
प्रियजनांचा सहवास लाभेल आणि हाती घेतलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी चांगली परिस्थिती राहील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार असून व्यापार-व्यवसायात भागीदारांची उत्तम साथ लाभेल. मानसिक ताण कमी होईल.