Anuradha Vipat
आजचा दिवस सकारात्मक राहील. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात.
आज आरोग्याची काहीशी तक्रार जाणवू शकते, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.
आज तुमच्या हितशत्रूंपासून काहीसा त्रास संभवतो, सावध राहा. वैवाहिक जीवनात जोडीदाराची अपेक्षित साथ आणि फायदा लाभेल.
आपली महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेणे फायद्याचे ठरेल. आर्थिक क्षेत्रात नवीन धाडस करायला हरकत नाही.
बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रात तुमची प्रगती होईल. व्यवसायात वाढ होण्याची उत्तम चिन्हे आहेत.
राहत्या जागेचे किंवा घराचे प्रलंबित प्रश्न आज मार्गी लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
आज तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडू शकते. कामात नातेवाईक आणि मित्रांचे चांगले सहकार्य लाभेल.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील आणि जुनी अडकलेली येणी वसूल होतील.
आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आज वादविवादापासून दूर राहणे अधिक हिताचे ठरेल.
कामाचा अतिरिक्त ताण आणि धावपळ जाणवू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या.
आज मित्र-मैत्रिणींचा उत्तम सहवास लाभेल आणि दिवस आनंदात जाईल. कठोर प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहा.
तुमची बरीच रखडलेली कामे आज यशस्वीपणे मार्गी लागतील, ज्यामुळे उत्साह वाढेल.