Anuradha Vipat
आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात आणि मनोबल काहीसे कमी राहील.मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.
काहींना अचानक आर्थिक लाभाचे योग संभवतात. राजकीय क्षेत्रातील लोकांना प्रयत्नांना यश लाभेल.
आज नवीन उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा राहील. तुमचे मनोबल उत्तम असेल.
कार्यक्षेत्रात उत्तम सुसंधी, प्रसिद्धी आणि यश लाभेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
कामानिमित्त प्रवास घडू शकतो, परंतु आवश्यक नसल्यास प्रवास करणे टाळावे.
वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद राहील आणि जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
अचानक धनलाभ संभवतो आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल आणि प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये उत्साह वाढेल.
प्रॉपर्टीची किंवा रिअल इस्टेटची कामे मार्गी लावू शकाल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल .
कामातील मेहनतीचे उत्तम परिणाम मिळतील.जिद्द आणि चिकाटी वाढेल.
अचानक धनलाभाची दाट शक्यता आहे आणि जुनी येणी वसूल होतील.
आरोग्याच्या जुन्या तक्रारी कमी होतील आणि मनोबल वाढवणारी एखादी सकारात्मक घटना घडेल.