Anuradha Vipat
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे, पण फटाके वाजवताना थोडीशी निष्काळजीपणा मोठा अपघात घडवू शकतो.
विशेषतः लहान मुलांची त्वचा अत्यंत नाजूक असते आणि ते धोके ओळखू शकत नाहीत.
मुलांना फटाके वाजवताना फक्त आणि फक्त सुती कपडेच घाला.
नायलॉन, पॉलिस्टर किंवा सिल्कचे कपडे घालू नका, कारण हे कपडे आग लवकर पकडतात आणि त्वचेला चिकटतात.
मुलांच्या पायात नेहमी शूज किंवा चपला असाव्यात. अनवाणी पायाने फटाके वाजवू देऊ नका.
लहान मुलांना कधीही एकटे फटाके वाजवू देऊ नका. घरातली एखादी मोठी व्यक्ती नेहमी त्यांच्यासोबत असावी.
भुईचक्र, अनार किंवा रॉकेट लावताना मुलाला सुरक्षित अंतरावर उभे करा. फटाका पेटवल्यानंतर लगेच मागे सरकण्यास सांगा.