Anuradha Vipat
आजचा दिवस सकारात्मक आणि कमालीच्या उत्साहाचा असेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. शांत राहून निर्णय घ्या.
कामाच्या ठिकाणी किंवा नवीन क्षेत्रात गुंतवणूक करताना विचारपूर्वक पाऊल टाका. कोणाकडूनही अवास्तव सहकार्याची अपेक्षा ठेवू नका.
रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि मित्रांच्या किंवा जवळच्या व्यक्तींच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक उत्तम ठरेल.
आर्थिक बाबतीत आजचा दिवस खूप चांगला आणि यशदायी आहे. अचानक धनलाभाची दाट शक्यता असून उत्पन्नाची नवीन साधने उपलब्ध होतील.
नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे आज मनोबल वाढेल. ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका.
आज तुमची वागणूक अत्यंत सौम्य आणि विनम्र राहील, ज्यामुळे जनसंपर्क वाढेल. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील.
पूर्ण उत्साह आणि चिकाटीच्या बळावर आज तुम्ही कठीण आणि धाडसी कामे वेळेत पूर्ण कराल.
तुमच्या कष्टाची आणि कामाची योग्य पावती आज तुम्हाला मिळेल. घरगुती आणि मुलांवरील खर्च थोडे वाढू शकतात.
तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारीच्या जोरावर आज तुम्ही कठीण आव्हाने सहजपणे हाताळू शकाल.
कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि घरात खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. कोणाशीही फालतू गोष्टींवरून वाद घालू नका.
आज विरोधक आणि प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. क्षुल्लक गोष्टींवरून वाद टाळा.
व्यापार-व्यवसायात मोठी वृद्धी होईल आणि शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील.