Anuradha Vipat
आज तुमची लोकप्रियता शिखरावर असेल. व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करू शकता
आर्थिक आवक मनासारखी राहील आणि धनवृद्धीचे योग आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन प्रकृतीत सुधारणा होईल.
साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची चांगली संधी मिळेल.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आणि शुभ फलदायी आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार असून मनातील आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील.
आज तुम्हाला एखादी महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी समजेल. जिद्दीने काम केल्यास यश नक्की मिळेल.
प्रॉपर्टीची किंवा रखडलेली कामे आज मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत उत्तम सुसंवाद साधू शकाल.
घरगुती वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही राहील. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटू शकतात.
बौद्धिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगली प्रगती पाहायला मिळेल.
राहत्या जागेचे किंवा जमिनीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. आज प्रवास सुखकर आणि आनंददायी होतील.
कार्यक्षेत्रातील तुमचे अंदाज अचूक ठरतील आणि उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल.