Anuradha Vipat
वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद साधाल. लोक थोडे चिडचिडे असू शकतात, त्यामुळे वादात पडणे टाळा.
आज तुमचा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. मनोबल थोडे कमी राहील.
बौद्धिक क्षेत्रात मोठी प्रगती होईल. रखडलेले आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.
प्रॉपर्टी किंवा स्थावर मालमत्तेचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन सुसंधी आणि प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत.
नोकरी आणि व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काही धाडसी निर्णय सहज पार पाडाल.
आर्थिक लाभाचे प्रमाण अतिशय समाधानकारक राहील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
मन अत्यंत आनंदी आणि आशावादी राहील. कला आणि सर्जनशीलता क्षेत्रात उत्तम सुसंधी लाभेल.
आज खर्चाचे प्रमाण वाढू शकते. आध्यात्माकडे कल वाढेल.
महत्त्वाचे पत्रव्यवहार किंवा ईमेल्स आज यशस्वीरीत्या पार पडतील. नवीन ओळखी आणि परिचय होतील.
सातत्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला गोष्टी संथ वाटल्या तरी संयम ठेवा.
काहींना अचानक तीर्थयात्रेचे योग येतील किंवा लांबचा प्रवास घडेल. गुरुकृपा लाभेल.
दैनंदिन कामे काहीशी रखडण्याची शक्यता आहे. वादविवाद पूर्णपणे टाळा.