Anuradha Vipat
जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही चमत्काराची नाही, तर रोजच्या शिस्तबद्ध सवयींची गरज असते.
सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला जगाच्या दोन पावले पुढे राहण्याची संधी मिळते.
यशस्वी व्यक्तींकडे वेळेची कमतरता नसते, कारण त्यांना वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित जमते.
रोज रात्री किंवा सकाळी उठल्यावर दिवसाभरात करायच्या कामांची यादी तयार करा.
वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही, तर विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची कौशल्ये सुधारतात.
यशस्वी लोक अपयशाने खचून जात नाहीत. ते प्रत्येक अपयशाला एक धडा मानतात आणि पुन्हा दुप्पट वेगाने प्रयत्न करतात.
तुमचे ध्येय नेमके काय आहे हे कागदावर स्पष्ट लिहिलेले असावे. ज्या लोकांचे ध्येय स्पष्ट असते, ते विनाकारण वेळेचा अपव्यय करत नाहीत.