Mahesh Gaikwad
आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही चुकीच्या सवयींचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे वेळीच या सवयी टाळल्यास आपल्याला निरोगी आयुष्य लाभते.
निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पुरेशी झोप. दररोज ७-८ तास झोप घेणे आवश्यक असते. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
शारीरिक हालचाल न केल्याने वजन वाढणे, पचनक्रिया बिघडणे आणि चयापचायाची क्रिया मंदावते.
जास्त प्रमाणात साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे साखरयुक्त पेय आणि स्नॅक्स टाळावे.
कमी पाणी पिण्याची सवय गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरते. कमी पाणी पिण्याने डिहायड्रेशन, त्वचेच्या समस्या यासह मूत्रविकाराचा धोका वाढतो.
धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारांसह यकृत, ह्रदय विकार आणि कर्करोगाचाही धोका संभवतो.
सतत मानसिक तणावात राहिल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी नियमित व्यायाम, मेडिटेशन करणे फायदेशीर ठरते.
आपल्या दैनंदिन आयुष्यातील या काही सवयी जर आपण बदलल्या तर त्याचा आपले आरोग्य निरोगी राहण्यास फायदा होतो.