Swapnil Shinde
मिचौंग चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला चांगलाच तडाखा बसला आहे.
गेल्या चार दिवसांत ११७ मिमी पाऊस झाल्याने अनेक जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
भात, केळी, नारळ आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने १.२३ लाख एकर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल तयार करण्यात आला आहे.
४७, ००० मेट्रिक टन कापणी केलेले धान पूर्णपणे भिजले आहे.
शेतात पाणी साचून राहिल्याने मळणी केला भात बाहेर काढणे अशक्य झाले आहे. तर काही गोदामात ठेवला भातही भिजला आहे.
शेतकऱ्यांकडून एकरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे