sandeep Shirguppe
सीताफळ एक पौष्टिक फळ आहे, ज्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात.
सीताफळात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनक्रिया सुधारते.
अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सिताफळात असते, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
सीताफळात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांना मजबूत बनवण्यास फायद्याचे ठरेल.
सीताफळात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
सीताफळात व्हिटॅमिन ए असते, जे दृष्टी सुधारण्यास फायद्याचे ठरेल.
सीताफळात प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण अधिक असल्याने वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम असल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.