Anuradha Vipat
कुरळ्या केसांची निगा राखणे थोडे कठीण असते. कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी खालील महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा.
कुरळे केस नैसर्गिकरित्या कोरडे असतात, त्यामुळे वारंवार शॅम्पू केल्याने त्यातील नैसर्गिक तेल कमी होते.
केसांना मॉइश्चराईज ठेवण्यासाठी सल्फेट-मुक्त शॅम्पूचा वापर करा .
प्रत्येक वेळी शॅम्पू केल्यानंतर केसांना चांगल्या दर्जाचे कंडिशनर लावा.
कुरळे केस ओले असताना किंवा कंडिशनर लावलेले असताना मोठ्या दातांच्या फणीने किंवा बोटांनी हळुवार विंचरा .
सामान्य टॉवेलने केस जोरात घासल्याने ते खराब होतात. त्याऐवजी मऊ कॉटन टी-शर्ट किंवा मायक्रोफायबर टॉवेलने केस हलक्या हाताने पूसा.
नारळ, जोजोबा किंवा अर्गन ऑइलने केसांना नियमित मसाज करा. हे तेल केसांच्या मुळांना ओलावा देते