Indigestion In Kids : लहान मुलांमध्ये होणाऱ्या अपचनावर सोपे उपाय; पोटातील गॅस आणि दुखणे होईल झटपट गायब

Anuradha Vipat

त्रास

लहान मुलांची पचनसंस्था खूप नाजूक असते, त्यामुळे त्यांना अपचन, गॅस, पोटदुखी किंवा उलट्या होण्याचा त्रास वारंवार होतो.

Indigestion In Kids | agrowon

समस्या

मुले व्यवस्थित न चावता घाईघाईने जेवल्यास किंवा जास्त तेलकट-जंक फूड खाल्ल्यास अपचनाची समस्या उद्भवते.

Indigestion In Kids | agrowon

कोमट पाण्याचे सेवन

अपचनामुळे पोट जड झाले असल्यास मुलाला थोडे थोडे कोमट पाणी प्यायला द्या.

Indigestion In Kids | agrowon

हिंगाची पेस्ट

जर मुलाच्या पोटात गॅस झाला असेल आणि पोट फुगले असेल, तर एक चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट मुलाच्या नाभीच्या भोवती हलक्या हाताने गोलाकार लावावी.

Indigestion In Kids | agrowon

ओवा आणि काळे मीठ

५ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना अर्धा चमचा ओवा थोडा भाजून त्यात चिमूटभर काळे मीठ घालून चावून खाण्यास सांगावे किंवा हे मिश्रण कोमट पाण्यासोबत द्यावे.

Indigestion In Kids | Agrowon

बडीशेपचे पाणी

एक चमचा बडीशेप एका ग्लास पाण्यात उकळून घ्या. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून मुलाला २-३ चमचे प्यायला द्या.

Indigestion In Kids | Agrowon

आले आणि मधाचे चाटण

३ वर्षांवरील मुलांसाठी हा उपाय उत्तम आहे. आल्याच्या रसात थोडे मध मिक्स करून चाटण दिल्यास पोटातील गुळमळणे आणि अपचन दूर होते.

Indigestion In Kids | agrowon

Chronic Cough : खोकला जुना झाला असल्यास काय करावे? झटपट आराम मिळवण्यासाठी प्रभावी उपाय!

Chronic Cough | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...