Chronic Cough : खोकला जुना झाला असल्यास काय करावे? झटपट आराम मिळवण्यासाठी प्रभावी उपाय!

Anuradha Vipat

जुनाट खोकला

वैद्यकीय भाषेत खोकला ८ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला, तर त्याला जुनाट खोकला म्हणतात.

Chronic Cough | agrowon

लक्षण

जुनाट खोकला हा केवळ एक सामान्य आजार नसून, तो शरीरातील इतर वाढलेल्या समस्यांचे जसे की दमा , ॲलर्जी, सायनस किंवा अ‍ॅसिडिटी/अम्लपित्त चे लक्षण असू शकतो.

Chronic Cough | Agrowon

मध, आले आणि काळी मिरी

एक चमचा शुद्ध मधात थोडा आल्याचा रस आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिक्स करा. हे चाटण दिवसातून २-३ वेळा थोडे थोडे घ्यावे.

Chronic Cough | agrowon

ज्येष्ठमध

जुनाट खोकल्यामुळे घशात होणारी जळजळ आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी ज्येष्ठमधाचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखत राहावा.

Chronic Cough | agrowon

हळदीचे कोमट दूध

रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद पावडर टाकून प्यावे.

Chronic Cough | Agrowon

गरम पाण्याची वाफ

दिवसातून दोनदा गरम पाण्यात थोडे नीलगिरी तेल किंवा पुदिन्याची पाने टाकून वाफ घ्या.

Chronic Cough | Agrowon

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून दिवसातून ३-४ वेळा गुळण्या करा.

Chronic Cough | Agrowon

Horoscope 15 September 2026 : 'या' राशीच्या लोकांना आज नशीब देईल पूर्ण साथ

Horoscope 15 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...