Anuradha Vipat
हिवाळ्यात दही खावे की नाही याबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत.
दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात.
हिवाळ्यात दही खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ दुपारची आहे. या वेळी शरीराचे तापमान जास्त असते.
हिवाळ्यात रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी उशिरा दही खाणे टाळावे. यामुळे सर्दी, कफ किंवा घसा खवखवणे अशा समस्या उद्भवू शकतात.
हिवाळ्यात फ्रीजमध्ये ठेवलेले अतिथंड दही थेट खाऊ नका.
हिवाळ्यात शिळे किंवा आंबट झालेले दही खाणे टाळा.
हिवाळ्यात साखर, मीठ किंवा इतर गोष्टी मिसळण्याऐवजी साधे दही खा.