Anuradha Vipat
हिवाळ्यातील थंड हवामानाचा लहान बाळांवर पटकन परिणाम होतो.
थंडच्या या काळात लहान बाळांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
बाळाला निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या काही टिप्स नक्कीचं कामी येतील
बाळाला लोकरीचे किंवा फ्लिसचे कपडे वापरा. बाळाला आंघोळ घालण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.
बाळाला नेहमी डोक्यावर टोपी , हातात ग्लोव्हज आणि पायात उबदार पायमोजे घाला.
थंडीमुळे बाळाची नाजूक त्वचा खूप कोरडी पडते. आंघोळीनंतर लगेच बेबी लोशन, क्रीम किंवा खोबरेल तेल लावा.
आंघोळीपूर्वी नियमितपणे बेबी ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.