Anuradha Vipat
दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात प्रोबायोटिक्सकॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
पण दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहिती असणे आपल्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे
आयुर्वेदानुसार दुपारच्या जेवणासोबत किंवा दुपारच्या वेळी दही खाणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते.
दुपारच्या वेळी शरीराची पचनक्रिया सर्वात मजबूत असते, त्यामुळे दही सहज पचते.
दुपारच्या वेळी दही खाल्ल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते
जेवणासोबत ताक किंवा दह्याची कोशिंबीर खाणे आरोग्यासाठी फार उत्तम आहे.
जरी अनेकांना रात्री दही खायला आवडते पण आयुर्वेद आणि आरोग्य तज्ञांनुसार संध्याकाळी उशिरा किंवा रात्री दही खाणे टाळावे.