Anuradha Vipat
दह्यात मीठ घालून खाल्यास त्यातील गुड बॅक्टेरिया, चांगले सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे दही खाणे शरीरासाठी फारसे लाभदायक नसते
आयुर्वेदानुसार, दह्यात मीठ टाकून खाल्यास शरीरावर नकारात्मक प्रभाव दिसून येतो. पित्ताची समस्या वाढते.
पित्तासाठी दह्यात मीठ घालून खाणे हे विषासमान आहे. दह्यात मीठ घालून खाल्ल्यास पचनास त्रास होतो.
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर दह्यात मीठ टाकू नका. हे शरीराला हानिकारक आहे.
तुम्हाला जर पोटाचे आजार असतील तर ही चुकीची पद्धत आहे. अशा पद्धतीने दह्याचे सेवन आरोग्यास हानिकारक ठरेल.
तुम्हाला जर खोकला असेल तर दह्यात मीठ टाकून खाऊ नका ते आरोग्यास चांगले नाही
साखर असो वा मीठ ते अगदी कमी प्रमाणात वापरल्यास दह्याचे सेवन फारसे हानिकारक ठरत नाही.