Cumin Health Benefits : अनेक आजारावर गुणकारी महौषधी जिरे

Team Agrowon

स्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे जिरे सर्वांनाच परिचित आहे. पदार्थाला चव येण्यासाठी जिरे वापरले जाते. पण औषध म्हणून जिरे उत्तम कार्य करते, हे फार कमी लोकांना माहिती असते.

Cumin Health Benefits | Agrowon

अत्यंत रुचकर आणि पाचक म्हणून जिरे काम करते. अजीर्ण अपचन यांवर अर्धीवाटी गोड ताकात जिरेपूड घालून जेवणामध्ये ताक प्यावे.

Cumin Health Benefits | Agrowon

काही वेळा तिखट खाल्ल्याने पोट बिघडते. यामध्ये पोट दुखते आणि चिकट शौचाला होते. अशावेळी जिरेपूड गरम पाण्यासह घ्यावी.

Cumin Health Benefits | Agrowon

लहान मुलांना जंत होतात. त्यांना १ ग्रॅम जिरेपूड, १ ग्रॅम वावडिंग गुळासह दिल्यास उपयोग होतो.

Cumin Health Benefits | Agrowon

स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाण्याची तक्रार असते. पाळीच्या दिवसातही खूप त्रास होतो. अशावेळी जिरेपूड, खडीसाखर तांदळाच्या धुवणासह दिल्यास फायदा होतो.

Cumin Health Benefits | Agrowon

धने-जिरे यांची पावडर साखरेसह घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Cumin Health Benefits | Agrowon

अंगात साठलेली उष्णता आणि कडकी यांवर जीऱ्याचा चांगला उपयोग होतो.

Cumin Health Benefits | Agrowon
आणखी पाहा...