Crop Protection Practices : अशी मशागत करा खरिपातील कीड, रोग टाळा?

Team Agrowon

शेताची तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. म्हणजे जमिनीत असलेल्या किडींच्या अवस्था जमिनीवर येऊन उन्हामुळे किंवा भक्षक पक्षांद्वारे नष्ट होतील.

Crop Protection Practices | Agrowon

पहिल्या पावसानंतर शेताच्या बांधावर असलेले तण नष्ट करावे. जेणेकरून किडीची पहिली पिढी तणांवर तयार होऊ शकणार नाही.

Crop Protection Practices | Agrowon

घरचे बियाणे वापरायचे झाल्यास बियाण्यास चाळणी लावून किडके, अशक्त बियाणे वेगळे करून त्याची उगवण शक्ती तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाणे वापरण्याचे प्रमाण ठरवावे.

Crop Protection Practices | Agrowon

उपलब्धतेनुसार कीड, रोग प्रतिकारक वाणाचा वापर करावा. बियाण्याची पेरणी करताना शिफारस केलेल्या अंतरानुसार पिकाची लागवड करावी.

Crop Protection Practices | Agrowon

कपाशी व इतर पिके हंगामा बाहेर घेणे टाळाव.

Crop Protection Practices | Agrowon

चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.

Crop Protection Practices | Agrowon

माती परीक्षण करूनच खताचा त्याप्रमाणे वापर करावा. नत्र खताचा अतिवापर टाळावा.

Crop Protection Practices | Agrowon