Ova Crop Cultivation : कोरडवाहूमध्ये हमखास उत्पादन देणाऱ्या ओवा पीकाची लागवड अशी करा लागवड

Team Agrowon

भारतात ओवा पिकाची लागवड प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थान या राज्यात होते. पण आता महाराष्ट्रातही छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भात  ओवा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जातेय.

Ova Crop Cultivation | Agrowon

विगवेगळ्या विभागातील परिस्थितीनूसार ओवा पिकाची पेरणी सप्टेंबर ते  ऑक्टोबर पर्यंत करता येते.

Ova Crop Cultivation | Agrowon

ओलिताची जर सोय असेल तर ओव्याची पेरणी ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील करतात.

Ova Crop Cultivation | Agrowon

लेट खरिपासाठीही ओवा पीक उत्तम पर्याय ठरतो. फक्त बियाणे तयार होताना वातावरण कोरड आणि पाऊस नसेल अशा प्रकारे आपल्याला ओव्याची पेरणी करायची आहे.

Ova Crop Cultivation | Agrowon

हे पीक १५० ते १६० दिवसात तयार होत. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी वाळुयुक्त जमीन निवडा. पेरणीसाठी हेक्टरी अडीच ते पाच किलो बियाण लागत.

Ova Crop Cultivation | Agrowon

पेरणी करताना बियाणे वाळूत मिसळून पेरणी करावी लागते. पेरताना दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंटीमीटर  ठेवून पेरणी करावी.

Ova Crop Cultivation | Agrowon

बियाणे अडीच ते ३ सेंटीमिटर पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

Ova Crop Cultivation | Agrowon

ओलीताखाली ओवा लागवडीकरिता सरी वरंबा पद्धतीचे ३ बाय २ मीटर लांबी रुंदीचे वाफे तयार करुन घ्यावे. त्यामध्ये ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर वरंब्यावर मधोमध बी टोकुन पेरावे. 

Ova Crop Cultivation | Agrowon

Kata Or Katha : मुखवासाठी उपयुक्त असणाऱ्या खाऊच्या पानातील कातही असते आरोग्यवर्धक; पाहा फायदे

आणखी पाहा...