Aslam Abdul Shanedivan
कात किंवा कथा याचे सेवन केल्याने दातांचे आजार दूर होतात. यासाठी कात पावडर दंतमंजनमध्ये मिसळून दात आणि हिरड्या स्वच्छ करावेत.
बऱ्याच वेळा काही लोक तोंड येतं म्हणजेच तोंडात फोड येतात अशा वेळी पानातून कात खाल्ल्यास आराम मिळतो.
कात खाण्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते. कात मधील काही घटकांमुळे तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत ठरणारे घटक नष्ट होतात
कात खाल्ल्याने लाळ उत्पादन वाढते, ज्यामुळे पचन क्रियेला मदत होते.
काही लोकांना कात चघळल्याने तणाव कमी होण्यास मदत मिळते
बदलत्या हवामानामुळे अनेकांना घशातील खवखव वाढते. अशा वेळी कातची भुकटी चघळल्यास घशातील खवखव दूर होते.
असे फायदे असले तरीही याचे नुकसान अधिक आहेत. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (वापराआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)