Bean Cultivation : अशी करा घेवड्याची लागवड

Team Agrowon

घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन निवडावी.

Bean Cultivation | Agrowon

लागवडीपूर्वी हेक्‍टरी पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले सुयश, कंटेडर या जाती निवडाव्यात.

Bean Cultivation | Agrowon

लागवड जून, जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत करावी.

Bean Cultivation | Agrowon

लागवड करताना सपाट वाफ्यात लागवड करताना ६० x ३० सें. मी. आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना ४५ x ३० सें. मी. अंतराने लागवड करावी.

Bean Cultivation | Agrowon

लागवडीसाठी हेक्‍टरी ४० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास १५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक प्रती १० किलो बियाण्यास चोळावे.

Bean Cultivation | Agrowon

लागवडीपूर्वी पिकाला २५ किलो नत्र, ११० किलो स्फुरद आणि ११० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे.

Bean Cultivation | Agrowon

लागवडीनंतर एक महिन्याने २५ किलो नत्र प्रतिहेक्‍टरी देऊन भर लावावी. साधारणपणे ११० दिवसांत पीक तयार होते.

Bean Cultivation | Agrowon