Team Agrowon
सर्व प्रकारच्या जमिनीत बडीसोप ची लागवड करता येते. पण पाण्याचा चांगला निचरा होणारी, कसदार, मध्यम जमीन बडीसोप लागवडीसाठी चांगली समजली जाते.
समशीतोष्ण हवामान बडीशोप पिकासाठी योग्य मानले जाते पण दमट आणि ढगाळ हवामानात मात्र बडीसोप ची लागवड करू नये. कारण अशा हवामानात कीड, रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये बडीशेप ची लागवड करतात. जमीन तयार केल्यानंतर साधारणपणे तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे वाफे तयार करावेत.
दोन ओळीत ६० ते ७५ सेंटीमीटर अंतर ठेवून आणि दोन रोपात ३० ते ४५ सेंटीमीटर अंतर ठेवून टोकन पद्धतीने बडीसोप ची लागवड करावी.
बडीसोपचे हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते. एक एकर पेरणीसाठी साधारण पाच ते सहा किलो बियाणे पुरेसे होते.
बडीसोप चे आर एफ १०१, को-१, आणि गुजरात सौफ -२ हे वाण उपलब्ध आहेत.
हेक्टरी ९० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद यांची मात्रा विभागून दिल्यास चांगलं उत्पादन मिळतं. नत्रयुक्त खताची अर्धी मात्रा आणि स्फुरद खताची पूर्ण मात्रा लागवडीपासून ३० दिवसांनी द्यावी. नत्रयुक्त खताची उलेली अर्धी मात्रा ६० दिवसांनी द्यावी.
जमिनीचा मगदूर आणि वातावरणाचा एकंदरीत अभ्यास करून १० ते १२ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्यात द्याव्यात.
बडीसोपच्या दाण्याच्या आकारावरून त्याची चव ठरत असते. साधारणपणे पूर्ण परिपक्व दाण्याच्या आकाराच्या निम्म्या आकाराची सोप चवीला गोड आणि स्वादिष्ट असते. त्यामुळे अशा प्रकारची बडीसोप फुले येणाऱ्या दिवसापासून ३० ते ४० दिवसानंतर काढणीसाठी तयार होते.