Team Agrowon
देशभरात मखना बिया आणि मखना फ्लेक्सला चांगली मागणी आहे. मखनाचा विस्तार पाकिस्तान, कॅनडा, चीन, मलेशिया आणि बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये झाला आहे.
आहारात मखनाच्या बियांचा समावेश केल्याने मॅक्रोमोलेक्युल आणि तंतुमय घटक वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
प्रथिने, विशेषतः भूक नियमनामध्ये मदत करते. काही अभ्यासानुसार, भरपूर तंतुमय घटकांचे सेवन हे पोटाची चरबी आणि जमा झालेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
योग्य पचनासाठी, आपल्या शरीराला तंतुमय घटकांची आवश्यकता असते. मखनामध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्थेला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करते.
जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा कठीण मल यांसारख्या समस्या असतील तर तुमच्या रोजच्या आहारात मखनाचा समावेश करावा.
मखनाचे सेवन केल्याने सुरकुत्या, बारीक रेषा आणि केस अकाली पांढरे होणे यांसारख्या वृद्धत्वाची लक्षणे टाळता येतात.
कमी मॅग्नेशिअम पातळीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. मखनामध्ये मॅग्नेशियमचे उच्च प्रमाण असते, जे रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन पातळी सुधारते, ज्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो.