Team Agrowon
कलिंगड लागवड २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी आळे पद्धत, सरी-वरंबा पद्धत, रुंद गादी वाफा पद्धत आणि मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करावा.
चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमिनीत लागवड टाळावी. या जमिनीतील विद्राव्य क्षारांमुळे फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. लागवड मध्यम-काळ्या ते करड्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.
उत्तम वाढीसाठी २२ ते २५ अंश सेल्सिअस, फळ धारणेसाठी आणि चांगल्या प्रतीचा फळांसाठी ३५ ते ४० अश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
शुगर बेबी, मधू, अर्का माणिक, मिलन, अमृत, अर्काज्योती, अर्का राजहंस,अर्का जीत.
जमिनीची खोल नांगरणी करून चांगले कुजलेले शेणखत, कोंबडी खत किंवा लेंडी खत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर ट्रॅक्टर किंवा बैलांच्या साह्याने वखराच्या दोन पाळ्या घालाव्यात.
लागवडीसाठी गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्याचा आकार २ फूट रुंद व १ फूट ठेवावा. दोन गादीवाफ्यांमध्ये ६ फूट अंतर ठेवावे.
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस थायरम ३ ग्रॅम चोळावे. लागवडीसाठी एकरी १ ते १.५ किलो बियाणे पुरेसे असते.