Chavali Cultivation : कडधान्य, भाजी, चारा तिहेरी फायदा देणारी चवळी

Team Agrowon

पावसाच्या पाण्यावर येणारं आपत्कालीन पीक म्हणून चवळी हे पीक ओळखल जातं. कडधान्य, भाजी, चारापीक आणि हिरवळीचे पीक म्हणूनही चवळीची लागवड केली जाते.

Chavali Cultivation | Agrowon

जून, जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर या दरम्यान केव्हाही पेरणी योग्य पावसानंतर चवळीची पेरणी करता येते.

Chavali Cultivation | Agrowon

चवळी हे पीक कमी कालावधीचे असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या पिकात मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणून बरेच शेतकरी चवळी पीक घेतात.

Chavali Cultivation | Agrowon

चवळी लागवडीसाठी मध्यम ते भारी,पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी योग्य पाऊस होताच वाफसा आल्यानंतर पेरणी करावी.

Chavali Cultivation | Agrowon

पेरणी ४५ सेंटीमीटर बाय १० सेंटीमीटर अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागत.

Chavali Cultivation | Agrowon

पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्याला ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाणाला २५ ग्रॅम रायझोबियम आणि पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

Chavali Cultivation | Agrowon

चवळी वाण आणि हंगामानूसार ६ ते ८ आठवड्यात तोडणीस तयार होते. चवळीचे हेक्टरी ५ ते ८ टनांपर्यंत हिरव्या शेंगाचे उत्पादन मिळते.

Chavali Cultivation | Agrowon