Coriander Cultivation : अशी करा कोथिंबीर लागवड

Team Agrowon

कोथिंबिरीची लागवड आपल्याकडे सर्व प्रकारच्या जमिनीत वर्षभर करण्यात येते. लागवडीसाठी मध्यम, काळी व निचऱ्याची जमीन निवडावी.

Coriander Cultivation | Agrowon

लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. डी.डब्ल्यू.डी.- ९, वैशाली, जीसी- १, २, ३ या जातींची निवड करावी.

Coriander Cultivation | Agrowon

लागवडीसाठी हेक्‍टरी ३० ते ४० किलो बियाणे लागते. बियाणे खरबडीत भागावर घासून घ्यावे. त्यानंतर लागवडीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर लागवड करावी.  

Coriander Cultivation | Agrowon

लागवडीपूर्वी शेत ओले करून घ्यावे. त्यामुळे उगवणक्षमता वाढते.

Coriander Cultivation | Agrowon

पाणी देण्यासाठी सारे पद्धतीचा अवलंब करावा. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे. म्हणजे बी वाहून जात नाहीत.

Coriander Cultivation | Agrowon

कोथिंबिरीसाठी प्रति हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश माती परीक्षणानुसार द्यावे. यापैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.

Coriander Cultivation | Agrowon

राहिलेले नत्र लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी द्यावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. 

Coriander Cultivation | Agrowon
आणखी पाहा...