Cucumber Lassi : तुम्ही कधी काकडीची लस्सी पिलाय का?

sandeep Shirguppe

काकडी लस्सी

तुम्ही कधी काकडीपासून बनलेली लस्सी प्यायली आहे का? काकडीची लस्सी पिल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Cucumber Lassi | agrowon

काकडीत थंडावा

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते तर दही शरीराला थंडावा देते.

Cucumber Lassi | agrowon

पोटाला गारवा

याचा पोटाला गारवाही मिळतो आणि शरीर हायड्रेटसुद्धा राहते. चला तर मग जाणून घेऊ थंडगार काकडीपासून बनणारी लस्सीची रेसिपी.

Cucumber Lassi | agrowon

साहित्य

काकडीची लस्सी बनवण्यासाठी एक काकडी, दही, धणे पावडर, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर, काळं मीठ, कोथिंबीर, बर्फ इत्यादी.

Cucumber Lassi | agrowon

कृती

सर्वप्रथम लस्सी बनवण्यासाठी पुदिन्यांची पाने हाताने बारीक करा. दुसरीकडे एका भांड्यात दही घेऊन ते छान फेटून घ्या.

Cucumber Lassi | agrowon

पुदीना पाने

त्यानंतर या दह्यामध्ये बारीक केलेली पुदिन्यांची पाने आणि थोड पाणी मिक्स करा.

Cucumber Lassi | agrowon

मिश्रण एकत्र करा

हे सर्व मिश्रण छान एकत्र करून झाल्यावर यामध्ये जिरे पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर, धणे पावडर आणि काळ मीठ अॅड करा.

Cucumber Lassi | agrowon

बर्फ

हे सर्व एकत्र करून एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर यात चार ते पाच बर्फाचे तुकडे अॅड करा.

Cucumber Lassi | agrowon

काकडी लस्सी पोष्टीक

सगळ्यात शेवटी पुदिन्याच्या पानांनी लस्सीवर सजावट करावी. अशाप्रकारे तुमची थंडगार काकडीची लस्सी तयार झाली.

Cucumber Lassi | agrowon