Swarali Pawar
पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, कपाशी आणि तुरीवर पाण्याचा ताण येत आहे. अशा वेळी काही सोपे उपाय करून पिकांना तग धरून ठेवता येते.
पीक वाळताना दिसत असेल तर शक्य असल्यास तातडीने संरक्षित सिंचन द्या. पाणी उपलब्ध नसेल तर पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांची फवारणी करता येते.
सोयाबीन आणि तुरीसाठी १३:०:४५ची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करा. सोयाबीन शेंगा भरण्यात आणि कपाशी बोंडांच्या अवस्थेत असल्यास ०:०:५०चा वापर करा.
सोयाबीन, कपाशी आणि तुरीवर ६ टक्के केओलिन म्हणजे ६० ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारता येते. यामुळे पानांवर पांढरा थर तयार होऊन बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
पालाशामुळे पानांवरील छिद्रांची उघडझाप नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे पिकातून पाण्याची वाफ कमी होऊन पीक कमी पाण्यात तग धरू शकते.
कपाशी आणि तुरीमध्ये कोळपणी करून जमिनीवरील भेगा बुजवा. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि मुळांना हवा मिळण्यास मदत होते.
जास्त अंतराच्या ओळीतील पिकांमध्ये सऱ्या पाडून पावसाचे पाणी जमिनीत मुरवा. परतीच्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवून ठेवणे पिकांसाठी फायदेशीर ठरते.
पिकाच्या ओळींमध्ये आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकतो. यासोबत तणांची वाढही कमी होते आणि पिकाला पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळते.