Anuradha Vipat
खमंग आणि कुरकुरीत शेव घरच्या घरी बनवण्यासाठी आम्ही दिलेली ही एक सोपी पद्धत नक्कीचं तुमच्या कामी येईल.
ही खमंग आणि कुरकुरीत शेव तुम्ही दिवाळीच्या फराळासाठी किंवा चिवड्यात घालण्यासाठी वापरू शकता.
बेसन पीठ – २ कप, तांदळाचे पीठ – १/२ कप, हळद – १/४ चमचे, लाल तिखट – १ ते २ चमचे, हिंग – १ चिमूट, ओवा – १ चमचा, मीठ , गरम तेल – २ मोठे चमचे, तळण्यासाठी तेल.
बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्यात हळद, लाल तिखट, हिंग, ओवा आणि मीठ घाला.
२ चमचे तेल गरम करून पिठावर घाला . थोडे थोडे पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्या. शेवग्याच्या साच्यात बारीक जाळीची चकती लावा आणि मध्यम आचेवर शेव पाडा.
शेव खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. शेव पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
शेव बनवताना सोडा वापरणे टाळा यामुळे शेव तेलकट होणार नाही