Anuradha Vipat
नाचणीचे डोसे डायबिटीस रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पॉलिफेनॉल असतात.
नाचणीमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. तसेच याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो डायबिटीस नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
नाचणीचे पीठ,रवा किंवा जवसाचे पीठ,ताक किंवा दही,बारीक चिरलेला कांदा,हिरवी मिरची,कढीपत्ता व कोथिंबीर,जिरे,मीठ,तेल/तूप.
नाचणीचे पीठ, रवा/जवसाचे पीठ, ताक आणि आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करून गुठळ्या होणार नाहीत असे पातळ मिश्रण तयार करा. या मिश्रणात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा.
हे मिश्रण १० ते १५ मिनिटे बाजूला झाकून ठेवा, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल.नॉन-स्टिक तवा गॅसवर गरम करा. तव्याला थोडे तेल किंवा तूप लावा.
तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर नाचणीचे मिश्रण कडेने सोडून गोलाकार पसरवा .हे मिश्रण पातळ असल्याने डोशाला छान जाळी पडते.
डोसा दोन्ही बाजूंनी मंद ते मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.