Anuradha Vipat
घरच्या घरी उरलेल्या इडल्यांपासून कुरकुरीत आणि चमचमीत 'इडली फ्राय' बनवायची सोपी पद्धत आज आपण पाहूयात.
इडली, तेल, मोहरी, जिरे, हिंग , कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस.
इडल्यांचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या.कढईत थोडे तेल गरम करा. तेलात इडलीचे तुकडे घालून मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
कढईत तेल गरम करा. तेलात मोहरी आणि जिरे,हिंग , कढीपत्ता टाका. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा घाला. कांदा सोनेरी होईपर्यंत चांगला परतून घ्या.
कांदा परतल्यावर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घाला. आता तळलेले इडलीचे तुकडे कढईत घाला. चवीनुसार मीठ घाला.
इडलीचे तुकडे मसाल्यांमध्ये चांगले मिसळून घ्या. मध्यम आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
इडलीवर लिंबाचा रस पिळा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा. गरमागरम आणि कुरकुरीत 'इडली फ्राय' चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.