Anuradha Vipat
कुरकुरीत आणि स्वादिष्ट कांदा भजी खायला तर सर्वांनाचं आवडतात.
कांदे, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, ओवा, जिरे, हिरवी मिरची,लाल तिखट,धणे पूड, आमचूर पावडर ,गरम तेल , कोथिंबीर.
कांदा पातळ चिरून घ्या. त्यात मीठ घालून 15 मिनिटे ठेवा. यानंतर त्यात वर दिलेले साहित्य मिक्स करुन घ्या.
एका कढईत तेल घेऊन मध्यम आचेवर गरम करा. तयार केलेले मिश्रण थोडे थोडे करून गरम तेलात सोडा.
भजी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
गरमागरम भजी चटणीबरोबर सर्व्ह करा
गरमागरम भजी चटणीबरोबर गरमागरम चहा तर एकदम योग्यचं.