Tikhat Shankarpale : दिवाळी फराळ असो वा मधल्या वेळेची भूक; तोंडची चव वाढवणारे तिखट शंकरपाळे

Anuradha Vipat

सोपी आणि खुसखुशीत रेसिपी

खाऱ्या आणि तिखट शंकरपाळ्या बनवण्याची अत्यंत सोपी आणि खुसखुशीत रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

Tikhat Shankarpale | agrowon

साहित्य

मैदा, ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, गरम तेलाचे मोहन, मीठ, पाणी,तेल.

Tikhat Shankarpale | agrowon

कृती

मैदा घ्या. त्यामध्ये ओवा, जिरे, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करा.

Tikhat Shankarpale | agrowon

मोहन घालणे

आता यामध्ये २ ते ३ मोठे चमचे कडकडीत गरम तेलाचे मोहन टाका. थोडे थंड झाल्यावर हाताने हे तेल संपूर्ण पिठाला चोळून घ्या. थोडे थोडे पाणी घालत घट्ट गोळा मळून घ्या. मळलेले पीठ कपड्याने झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.

Tikhat Shankarpale | agrowon

लाटणे

पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. पोळपाटावर थोडे घट्ट आणि मध्यम जाडीचे पोळीसारखे लाटून घ्या.

Tikhat Shankarpale | agrowon

कापणे

सुरीने किंवा शंकरपाळीच्या चमच्याने तुम्हाला आवडतील तसे चौकोनी किंवा डायमंड आकारात शंकरपाळ्या कापून घ्या.

Tikhat Shankarpale | agrowon

तळणे

कढईत तेल मध्यम गरम करा. मंद ते मध्यम आचेवर शंकरपाळ्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Tikhat Shankarpale | agrowon

Pudachi Karanji Recipe : पुडाची करंजी रेसिपी: जिभेवर विरघळणारे अचूक साट्याचे प्रमाण आणि पदर सुटण्याची सोपी पद्धत!

Pudachi Karanji Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...