Anuradha Vipat
फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणे पर्यावरणासाठीच नाही, तर आपल्या आरोग्यासाठी एक उत्तम निर्णय आहे.
यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त, सुरक्षित आणि तितकीच आनंददायी साजरी करण्यासाठी येथे काही हटके आणि सोप्या आयडिया दिल्या आहेत:
चायनीज दिव्यांऐवजी मातीच्या पारंपरिक पणत्यांचा वापर करा. यामुळे स्थानिक कुंभारांना मदत होईल.
घर उजळवून टाकण्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या आणि डिझाईन्सच्या एलईडी माळा वापरा.
काचेच्या भांड्यात पाणी भरून, त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि तरंगणारे दिवे ठेवून घराचा कोपरा सजवा.
रासायनिक रंगांऐवजी झेंडू, गुलाब, मोगरा आणि आंब्याची पाने वापरून रांगोळी काढा. यामुळे घराला छान सुगंधही येईल.
फटाक्यांवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी तो पैसा अनाथालय, वृद्धाश्रम किंवा रस्त्यावरील गरजू मुलांना कपडे, मिठाई किंवा शैक्षणिक साहित्य देण्यासाठी वापरा.