Roshan Talape
रात्री झोपताना टाचांवर तेल किंवा लोणी लावून मसाज करा आणि सॉक्स घाला, यामुळे भेगा लवकर भरतात.
गुळवेल, बदाम किंवा नारळाच्या तेलाने टाचांची मालिश केल्याने त्वचेला पोषण मिळून भेगा भरायला मदत होते.
टाचांना दररोज मॉइश्चरायझर लावल्याने त्या मऊ व निरोगी राहतात.
मध व लिंबाचा रस टाचांवर लावल्याने नैसर्गिक ओलावा मिळतो आणि भेगा भरण्यास मदत मिळते.
कोमट पाण्यात मीठ टाकून पाय भिजवल्यास त्वचा मऊ होते व भेगा कमी होतात.
बेकिंग सोडा आणि पाण्याच्या पेस्टने टाचांवर स्क्रब केल्याने मृत त्वचा दूर होण्यास मदत होते.
टाचांवरील मृत त्वचा काढण्यासाठी प्यूमिक स्टोनचा वापर करा. यामुळे त्वचा मऊ होऊन भेगा भरायला मदत मिळते.